इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केले आहे. “मी सध्या कुठेही सैन्य पाठवत नाहीये,” असे स्पष्ट करत त्यांनी परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लष्करी हालचालींबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, “अनेक लोक सैन्य तैनात करण्याबाबत […]
सावधान! एक्सपायरी अंडे खाल्ल्याने होऊ शकते फूड पॉइजनिंग
आपण रोज आहारामध्ये अंडी खातो. परंतु ही अंडी एक्सपायरी डेट न पाहता खाल्ल्यास खूप गंभीर परीणामांना सामोरे जावे लागते. मात्र ही छोटी चूक आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, एक्सपायरी अंडे खाल्ल्यास सर्वात जास्त परिणाम पचनसंस्थेवर होतो. प्रोटीन खराब झाल्यामुळे शरीर ते नीट पचवू शकत नाही. त्यामुळे गॅस, पोट […]
चेहरा काळवंडल्यानंतर दह्याचा असा फेस पॅक चेहऱ्याला लावा, लगेच येईल निखळ उजळपणा
दही हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच दही हे आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप उत्तम मानले जाते. उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. तीव्र उष्णतेमुळे त्वचा काळवंडते. त्यामुळेच उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेसाठी दही हे फार महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात त्वचेसाठी दह्याचे महत्व खूप मोठे आहे. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिड मुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. […]
Assam Assembly election –काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाही, वाचा सविस्तर
आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या नवीन यादीत २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून, यात अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक समितीने या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, यात गोलकगंजमधून कार्तिक चंद्र राय, बिरसिंग जरुआमधून वाजेद अली चौधरी आणि बिलासीपारामधून अमृत बादशहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. […]
अडचणीच्या काळात इराणला साथ दिली नाही, भविष्यात याचा त्रास होणार –राज ठाकरे
काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होतायत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे […]
‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाची ‘शेर-ए-बलुच’ स्टाईल अजूनही चित्रपटप्रेमींच्या मनात ताजी आहे. बहरीनी कलाकार फ्लिपार्चीच्या सुपरहिट गाणे ‘FA9LA’ वरील त्याची जादुई एन्ट्री आणि बलुच कॅम्पमधील त्याचा उत्स्फूर्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता सध्या सर्वांचेच लक्ष रणवीर सिंहच्या एन्ट्रीकडे लागले आहे. रणवीरच्या एन्ट्रीला लागणारे दिदी हे गाणे एक नव्हे तर तीन दशके जुने आहे. […]
संगमनेर वडगाव पान परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ल्याने तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा चा़गलाच हादरला असताना तब्बल ५० तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर हतबल झालेल्या पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध करत नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. मंगळवार १७ मार्चला शाळा सुटल्यानंतर शिकवणी आटोपून घरी जात […]
इस्त्रायल इराण युद्धाचा परीणाम हिंदुस्थानच्या राजधानीवर मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळत आहे. इराण युद्धामुळे सुया, थर्मामीटर आणि रक्तदाब मापक यंत्रांच्या किमती २० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. पिस्ता, आलुबुखार, मनुका, अंजीर, खजूर आणि मामरा यांसारख्या इराणी सुक्या मेव्याच्या किमती ३०-४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. हे युद्ध असेच चालू राहिले, तर दिल्लीच्या उद्योगाला ५,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे नुकसान होऊ […]
मुंबई –गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टॅंकर पलटी
मुंबई – गोवा महामार्गावर चारवेली गावाजवळ एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर एक मार्गिका पंधरा मिनिटे बंद होती. दुसऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरु होती. आज सायंकाळी साडे सहा वाजता हा टॅंकर चरवेली जवळ पलटी झाला. टॅंकर पलटी झाल्यानंतर त्या बाजूची वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर बाजूला करण्यात […]
आज इराणवर होणार सर्वात मोठा हल्ला, अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी दिला इशारा
इराण आणि इस्रायलमधील तणाव आता पराकोटीला पोहोचला असून, अमेरिकेने इराणला इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी आज एका अत्यंत आक्रमक निवेदनात म्हटले आहे की, इराणवर आजवरचा सर्वात मोठा स्ट्राईक पॅकेज (हल्ला) केला जाणार आहे. या इशाऱ्यामुळे संपूर्ण जगात, विशेषतः मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. अमेरिकेचे युद्धमंत्री पीट […]
तेल, गॅस कंपन्यांनी सरकारकडे डेटा जमा करणे अत्यावश्यक, केंद्र सरकारचा आदेश
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे एलएनजीच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळेच आता हिंदुस्थानातील नैसर्गिक वायू पुरवठ्याचा साठा मर्यादीत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ अंतर्गत एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आदेश, २०२६ अंतर्गत, सरकारने देशातील सर्व तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांना पेट्रोलियम नियोजन […]
पश्चिम बंगालमधील वरिष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आता हिंदुस्तानातील राजकारण तापले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली असून, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगावर केलेल्या आरोपांना केजरीवाल यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधताना […]
दिल्लीतील पालम परिसरात एकाच कुटुंबातील ९ जणांचा बळी घेणाऱ्या भीषण अग्निकांडाच्या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. गुरुवारी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आणि शोकसभा आयोजित करण्यात आली असताना, आम आदमी पार्टी (AAP) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालम येथील त्या दुर्दैवी कुटुंबाच्या […]
जंगल सफारीवर जाताना काय खबरदारी घ्यायला हवी, जाणून घ्या
नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे जंगल सफारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या याबाबत आपण सजग होणे गरजेचे आहे. ताडोबा जंगल सफारीदरम्यान वाघाचा फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी पाहता, वनविभागाला त्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला होता. त्यामुळेच जंगल सफारी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. साहसी लोकांसाठी जंगल सफारी हा एक […]
पश्चिम आशियातील युद्धाचा फटका रिअल इस्टेटला, दक्षिण मुंबईतील गगनचुंबी घरांच्या किमतीत होणार वाढ
पश्चिम आशियातील युद्धाचा फटका आता दक्षिण मुंबईला मोठ्या प्रमाणात बसण्यास सुरुवात झालेली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधील व्यत्ययामुळे दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेटचे दर चांगलेच वधारले आहेत. एका संशोधनानुसार, बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी विकासकांना १० ते २० दिवसांच्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या घडीला युद्धाच्या वातावरणामुळे जहाजे आता अधिक लांबच्या मार्गांनी वळवली जात आहेत. यामुळे वाहतुकीचा […]
नाशिकमधील वादग्रस्त अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरात याच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे चाकणकर यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आता करुणा मुंडे यांनी केली आहे. सरकारने चाकणकर यांचा राजीनामा घेतला नाही, तर थेट मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. बीड येथे पत्रकारांशी […]
नाशिकमधील वादग्रस्त अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात याला पाठीशी घालत आहेत का? असा खळबळजनक सवाल ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चाकणकर यांची पदावरून हटवण्याची मागणी देखील केली आहे. तक्रारदारांवरच कारवाईचा […]
चारधाम यात्रा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद, गतवर्षीचा विक्रम मोडीत निघणार
चारधाम यात्रा येत्या काही दिवसांमध्ये आता सुरु होणार आहे. त्याकरता भाविकांनी ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याच्या, अवघ्या 12 दिवसांतच 7 लाखांपेक्षा अधिक नोंदणी झाली आहे. ही नोंदणी ज्या वेगाने होत आहे ते पाहता, यंदा २०२५ मध्ये नोंदवलेला ५१ लाख यात्रेकरूंचा विक्रम यावर्षी मोडला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर्षीची यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू […]
कौटुंबिक वादातून रक्ताचा सडा! चाकूरच्या द्वारीत मेव्हण्याने मेव्हण्यावर केला चाकूने भीषण हल्ला
चाकूर तालुक्यात कौटुंबिक वादातून चाकू हल्ला; एक गंभीर जखमी चाकूर – चाकूर तालुक्यातील द्वारी येथे कौटुंबिक वादातून चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारा रात्री साडेनऊ वाजता घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला [...]
राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धा 27 मार्चपासून
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा धाराशिवच्यावतीने राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धा 27, 28, 29 मार्च या तीन दिवशी होणार असून, प्रथम पारितोषिक 51 हजार 990 ठेवण्यात आले आहे. अशी माहिती विशाल शिंगाडे व धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. गुरूवार दि. 19 मार्च रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना कुलकर्णी यांनी हे स्पर्धेचे 7 वे वर्ष असून, पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातून नाट्य संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. नाट्य संघाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 51 हजार 990, द्वितीय पारितोषिक 31 हजार, तृतीय 21 हजार रूपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट पार्श्वसंगीत, उत्कृष्ट नेपथ, उत्कृष्ट अभिनय पुरूष, उत्कृष्ट अभिनय स्त्री, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट संहिता लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन आदीसाठी वैयक्तिक पारितोषिक ठेवण्यात आले आहेत. यावेळी सुगत सोनवणे, आलम बेग, यशवंत शिंगाडे, शेषनाथ वाघ आदी उपस्थित होते. दोन दिवस नृत्य स्पर्धा नाट्य परिषद धाराशिव शाखेच्यावतीने 30 व 31 मार्च रोजी नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समुह नृत्य, वैयक्तिक नृत्य, लावणी नृत्य यामध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. प्रथम पारितोषिक समुह नृत्यासाठी 21 हजार रूपये आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे शुभम खोत व सुरेश देवकुळे यांनी सांगितले. तसेच शेवटच्या कलावंतांचा मेळावा ही घेण्यात येणार आहे.
बाळीवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती सोलापूर -गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाळीवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आयोजित श्री मल्लिकार्जुन यात्रेला महाप्रसादाच्या वाटपाने उत्साहात सुरुवात झाली. बुधवारी (दि. १८) हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी महाप्रसादासाठी तयार करण्यात आलेल्या हांड्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास महाप्रसाद [...]
भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात
धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून धाराशिवकडे परतणारे धाराशिव जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या गाडीला सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. गुरुवारी पहाटे भिगवणजवळील डाळज 2 गावाजवळ एका भरधाव कंटेनरने सावंतांच्या फॉर्च्युनर कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून, सुदैवाने धनंजय सावंत यांच्यासह त्यांचे सहकारी बालंबाल बचावले आहेत. या अपघातामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत धनंजय सावंत यांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याचा आनंद साजरा करून ते फॉर्च्युनर कारने धाराशिवच्या दिशेने निघाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास भिगवणजवळ मागून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने त्यांच्या गाडीला चालक बसलेल्या बाजूने भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर कारच्या ड्रायव्हर साईडचा पूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. धडक बसताच गाडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. मात्र, एअरबॅग्ज आणि नशिबाची साथ यामुळे धनंजय सावंत यांना कोणतीही मोठी इजा झाली नाही. गाडीचा चालक आणि अंगरक्षक हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
वाचवतंय कोण?” तुळजापूर यात्रा मैदान घोटाळ्यात मोठा प्रश्नचिन्ह!
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात आरक्षित जागा आहे पार्श्वभूमीवर येथील बहुचर्चित यात्रा मैदान घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, “वाचवतंय कोण?” हा सवाल आता जनतेतून जोर धरू लागला आहे. चौकशी समितीने तपास पूर्ण केल्याची माहिती समोर येत असली तरी अहवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, समितीने तक्रारीतील काही मुद्द्यांना ‘क्लीन चिट’ दिली असली तरी बनावट रेखाकन नकाशे, बोगस कागदपत्रे व दस्त नोंदणी या गंभीर मुद्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. हा अहवाल आता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या टेबलवर जाणार असून, त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूर नगरपरिषदेने सर्वे नं. 138 मधील 2 हेक्टर 63 आर जमीन यात्रा मैदानासाठी संपादीत केली होती. मात्र हीच जमीन हडप करून विक्री केल्याची गंभीर तक्रार संभाजी नेपते व किरण यादव यांनी केली होती. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या अध्यक्षतेखालील प्राथमिक समितीने काही मुद्यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीनेच आता बनावट नकाशे, अकृषी परवाने, बांधकाम मंजुरी आणि खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठे गैरप्रकार झाल्याचे निष्कर्ष काढल्याची चर्चा आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आणि आमदार सुरेश धस यांनी लक्ष घातल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली होती. मात्र अजूनही फाईल हालचाल संथच असल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनीही कारवाईसाठी आवाज उठवत पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
अस्वच्छता, पाणीटंचाई पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे आंदोलन
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये वाढत्या पाणीटंचाई व स्वच्छतेच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शुक्रवार दि. 20 मार्च रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे नगरसेवक अमोल कुतवळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उन्हाळ्याची सुरुवात होताच शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. यासोबतच काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी समोर येत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, 20 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विरोधी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.“पाणीपुरवठा सुरळीत करावा, स्वच्छता राखावी आणि दूषित पाण्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा,” या प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तीर्थक्षेत्रात भाविकांचा वाढता ओघ आणि त्यातच मूलभूत सुविधांची बोंब प्रशासनासाठी ही गंभीर इशाऱ्याची घंटा ठरत आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा पारंपारिक पद्धतीने साजरा
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दरबारात चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक 19 रोजी गुढीपाडव्यानिमित्ताने श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर शिखरावर सकाळी गुढी उभारण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसानिमित्त तुळजापुरात भक्ती, परंपरा आणि चैतन्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. पहाटे देवीजींना साखरेचा हार घालण्यात आला मुख्य महंत तुकोजी बुवा आणि वाकोजी बुवा यांच्या हस्ते शिखरावर गुढी उभारण्यात आली. नंतर गुढीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक अनुक्रमाले सह पुजारी मंदिर कर्मचारी उपस्थित होते. आज आई तुळजाभवानीला साखरेचा हार, शिवकालीन दागिने घालण्यात आले होते. आज शहरातही घरोघरी गुढ्या उभारण्यात आले होत्या. रात्री मंदिर प्रांगणात छबीना काढण्यात आल्यानंतर गुढीपाडव्या सणाच्या धार्मिक विधीचा सांगता झाली. तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागातही गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजांनी आपल्या शेतात पांडवाचे पूजन करून गुढीपाडवा साजरा केला.
५ कोटींची खंडणी आणि ५८ अश्लील व्हिडीओ, अशोक खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे
धार्मिक अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता संपूर्ण हिंदुस्तान हादरले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढती व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासाची संपूर्ण धुरा आता महिला आयपीएस […]
पंढरपुरात विठ्ठल मंदिरात रंगीबेरंगी फुलांचा गालिचा पंढरपूर, दि. १९ : चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आज (गुरुवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्यामुळे श्रींचा गाभारा अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत आहे. या सजावटीसाठी पिंक [...]
दिनेश कार्तिक पुन्हा एकदा बाबा झाला, पत्नी दीपिकाने दिला गोंडस मुलीला जन्म
माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक पुन्हा एकदा बाबा झाला आहे. पत्नी दीपिका पल्लीकलने एका मुलीला जन्म दिला आहे. दीपिका एक प्रसिद्ध स्क्वॅश खेळाडू आहे. या जोडप्याने २०२१ मध्ये त्यांच्या तिसऱ्या अपत्याचे, म्हणजेच जुळ्या मुलांचे, स्वागत केले होते. कार्तिक आणि पल्लीकल यांनी २०२१ मध्ये कबीर आणि जियान या जुळ्या मुलांचे स्वागत केले होते. या जोडप्याने आपल्या […]
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर धाराशिव येथील रसायनशास्त्र विभागामध्ये “ऑक्सिडायजिंग ॲड रिडयुसिंग रियजंटस इन ऑरगॅनिक सिन्थेसिस ” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले (दि. 11 व 12 मार्च). ही कार्यशाळा - योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. आर. बी. चौगुले (संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव) हे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर डॉ. आर. एम. तिगोटे (रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव) हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रा. डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन व विद्यापीठ गीत गायनाणे झाली. उद्घाटन कार्यक्रमात कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. के. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच या कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एम. तिगोटे यांनीही कार्यशाळेच्या संदर्भात माहिती देत ही कार्यशाळा उत्कृष्टरीत्या पार पडेल अशी आशा व्यक्त केली. उद्घाटक प्रा. डॉ. आर. बी. चौगुले यांनी आपल्या मनोगतात विज्ञान आणि साहित्य यांचे परस्पर नाते स्पष्ट केले तसेच कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. पी. बारकुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभय घोडके यांनी केले. या कार्यशाळेस सुमारे 150 विद्यार्थी व प्राध्यापकांनी उपस्थिती नोंदविली. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये रसायनशास्त्रातील ऑक्सिडायझिंग तसेच रिड्युसिंग रिएजेंट्स या विषयावर एकूण पाच विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी तीन सत्रांमध्ये ऑक्सिडायझिंग रिएजेंट्स व संबंधित अभिक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले, तर दोन सत्रांमध्ये रिड्युसिंग रिएजेंट्स या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेमध्ये प्रा. डॉ. बापू शिंगटे (रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. एस. वाय. जाधव (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, दयानंद विज्ञान व कला महाविद्यालय, सोलापूर), डॉ. हरीश होल्ला (सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक, कलबुर्गी), प्रा. डॉ. शेषनाथ भोसले (रसायनशास्त्र विभाग, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक, कलबुर्गी) व डॉ. व्ही. डी. कडू (अधिसभा सदस्य व सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र संकूल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. एस. वाय. जाधव व डॉ. व्ही. डी. कडू यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे हे अध्यक्षस्थानी होते. समारोपीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एम. के. पाटील यांनी कार्यशाळेचा अहवाल सादर केला. प्रा. डॉ. एस. वाय. जाधव यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांनी आपण या विभागाचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगून अशा प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम विभागात सातत्याने आयोजित केले जातात व त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीस चालना मिळते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. पी. हावळ यांनी मानले, तर समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या दोन दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. के. पी. हावळ, डॉ. आर. एम. तिगोटे, डॉ. एम. के. पाटील, डॉ. आर. पी. बारकुल, कविता चव्हाण तसेच विभागातील सर्व संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
भुम (प्रतिनिधी)- भूम तालूक्यातील माणकेश्वर येथील जि प प्राथमिक शाळा (अंधारेवस्ती) येथील इयत्ता 5 वी च्या वर्गातील विद्यार्थिनी कु.आरोही अमोल सांगडे हिची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे निवड झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये आरोहीने उज्वल यश प्राप्त करून जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे प्रवेश मिळवला आहे. आरोहीने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले आहे. आरोहीला वर्ग शिक्षक श्री .दत्ता घोडके, तिचे आई वडील , मुख्याध्यापिका अलका तांबे, संदीप मोरे, अमोल चोपडे, प्रमिला जावळे, मंजुषा सुरवसे, विद्या वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल राहुल भट्टी (गटशिक्षणाधिकारी भूम), सोमनाथ टकले (विस्ताराधिकारी आष्टा) व निळकंठ बशेट्टी (केंद्रप्रमुख माणकेश्वर) यांनी तिचे अभिनंदन केले. आरोहीच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ माणकेश्वर यांच्याकडून कौतुक होत आहे.
प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करावी- विद्यासागर चव्हाण
उमरगा (प्रतिनिधी)- आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला असून ए. आय, चाट जी पीटी , गुगलच्या साह्याने जागतीक पातळीवरील ज्ञान क्षणात आपण मिळवू शकतो, याच ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारी बनावेत व देशाची सेवा करावी असे मत नगर विकास मंत्रालयातील निवृत साहययक सचिव विद्यासागर चव्हाण यांनी व्यक्त केले. शहरातील मायक्रोकॉम संस्थेला 26 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यार्थी मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी विद्यासागर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बाबाजी मकानदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम एज्युकेशन फांउडेशन जिल्हा संपर्क अधिकारी प्रा. सुमित कोथिंबीरे हे उपस्थित होते. यावेळी बाबाजी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर संस्कार जपणे गरजेचे असून जीवनात आई वडीलांची सेवा व गुरुंचा आदर करणे ही भारतीय संस्कृती असून हीं जोपासने काळाची गरज आहे असे विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे संचालक प्रा युसूफ मुल्ला यांनी केले व आभार युनूसभाई शेख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योगाशिवाय पर्याय नाही : कौशल्य,भांडवल व मार्केटिंगवर भर देऊन उद्योजक व्हा- महाव्यवस्थापक अमोल बळे
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव, दे आसरा फाउंडेशन पुणे तसेच व्यवस्थापन शास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज एमआयडीसी येथील विद्यापीठाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात नवउद्योजकांनी उद्योग उभारणीसंदर्भातील विविध बाबींची सविस्तर माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्या हस्ते झाले.यावेळी एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक डी.व्ही.खाडे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच दे आसरा फाउंडेशनच्या सायली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून बळे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीच्या संधी कमी होत आहेत.त्यामुळे उद्योगाशिवाय पर्याय उरलेला नाही.जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. कौशल्य,आर्थिक पाठबळ,शासकीय मदत आणि प्रभावी मार्केटिंग या चार टप्प्यांवर शासन उद्योजकांना सहाय्य करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र उद्योग उभारणीसाठी सदैव तयार असून विविध योजनांद्वारे 800 पेक्षा अधिक उद्योगांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मदत करण्यात आली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक खाडे म्हणाले की,उद्योजक होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.पूर्वी शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हा होता,मात्र आता शिक्षणाचा उपयोग उद्योग निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूखंड,पायाभूत सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध करून उद्योगांना चालना दिली जाते.गुंतवणूक व उद्योग निर्मिती हा विकासाचा मुख्य आधार असल्याचे ते म्हणाले. खडसे म्हणाले की,धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे.त्यामुळे शेतीपूरक उद्योगांची गरज अधिक आहे. अशा उद्योगांमुळे रोजगारनिर्मिती होऊन जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावू शकते.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी उद्योगक्षेत्रात पुढे यावे.असे त्यांनी सांगितले. सायली जाधव म्हणाल्या की, स्वतःचा उद्योग उभारल्यास केवळ स्वावलंबनच नव्हे तर इतरांनाही रोजगार देता येतो. उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रभावी मार्केटिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक आहे.असे त्या म्हणाल्या. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुरल एंटरप्राइजेस फायनान्स सपोर्ट कन्सल्टंट पल्लवी पाटील यांनी भांडवल गुंतवणूक व आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केले. सनदी लेखापाल लक्ष्मण वाकुरे यांनी आयटीआर व जीएसटी रिटर्न भरताना घ्यावयाची काळजी यावर माहिती दिली.संजय देशमाने यांनी उद्योगातील आव्हाने व उपाय मांडले,तर अशोक चव्हाण (मुंबई) यांनी मार्केटिंगचे महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय उद्योजक व मध उत्पादन तज्ज्ञ तेजस लिमकर यांची मुलाखत घेण्यात आली. चर्चा सत्रात उपस्थित उद्योजकांनी प्रश्नोत्तरांमध्ये सक्रिय सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संजय गुरव यांनी केले, आभार प्रदर्शन व्यवस्थापन विभाग प्रमुख सुयोग अमृतराव यांनी केले.
Ratnagiri News –माभळे गावात भीतीचे सावट, चौपदरीकरणामुळे घरांना तडे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे माभळे गावातील नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान करण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे गावातील काही घरांना तडे गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सदर मार्गाचे काम तब्बल 17 वर्षे रखडले होते. सोनवी पुलासह रखडलेली कामे आता वेगाने सुरू झाली असली तरी […]
निपाणी येथे महारेशीम मेळावा, रेशीम शेतीस नवे मार्गदर्शन
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी येथे आज दि.18 मार्च रोजी महारेशीम अभियान 2026 अंतर्गत शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यात रेशीम शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी समजून घेण्यात आल्या तसेच रेशीम विकासाशी संबंधित विविध शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.राजकुमार मोरे,कळंब येथील गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय अधिकारी शिंदे,रेशीम विकास अधिकारी श्रीमती वाकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कळंब तालुक्यातील क्षेत्रसहायक श्री.एस.एच.सुर्यवंशी,श्री.एन.ए.पवार, तांत्रिक सहाय्यक जुनेद उस्मानी तसेच प्रगतिशील रेशीम शेतकरी श्री.बालाजी पवार आणि चॉकीधारक शेतकरी अतुल लुगडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी रेशीम शेतीतील उत्पादनवाढ,रोग व्यवस्थापन, कोषपालन तंत्रज्ञान तसेच शासनाच्या विविध अनुदान व सहाय्य योजनांचा लाभ घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यास परिसरातील विविध गावांतील रेशीम शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच निपाणी गावचे तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच व इतर मान्यवरही उपस्थित होते.या उपक्रमामुळे रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढून उत्पादनवाढीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे; शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासन सज्ज
धाराशिव (प्रतिनिधी)- माहे मार्च,2026 मध्ये जिल्ह्यात झालेल्या आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे तसेच जिवित व वित्तीय नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळण्यासाठी नुकसानाचे अचूक पंचनामे करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरीय समितीच्या आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीमार्फत बाधित क्षेत्रामध्ये तात्काळ पंचनामे करण्यात येत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून विहित नमुन्यात पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय कृषी अधिकारी,धाराशिव,सर्व तहसीलदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत की, ग्रामस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यांच्या आधारे विहित नमुन्यातील निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या क्षेत्रातील पीक नुकसान व फळबाग नुकसानीची माहिती संबंधित ग्रामस्तरीय समिती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे तात्काळ कळवावी. जेणेकरून पंचनामे वेळेत पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करता येईल,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. तसेच ज्यांची ई-पीक पाहणी बाकी आहे, त्यांस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याने सर्व उर्वरित ई-पीक पाहणी सहाय्यकांमार्फत करून घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 18 ते 31 मार्चपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अंतर्गत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश काढण्यात आले आहे.त्यानुसार 18 मार्च रोजी रात्री 1 पासून ते 31 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत.जिल्ह्यात 19 मार्च रोजी गुढी पाडवा,21 मार्च रोजी रमजान ईद, 26 मार्च रोजी रामनवमी,27 मार्च रोजी तुळजाभवानी चैत्री यात्रा (तुळजापूर) 30 मार्च रोजी येडेश्वरी चैत्री यात्रा (येरमाळा) आणि 31 मार्च रोजी महावीर जयंती असे विविध धर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या सण-उत्सवांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच सध्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात विविध समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून धरणे, मोर्चे, आंदोलन, उपोषण, बंद, रास्तारोको, तालाठोको अशा आंदोलनात्मक कार्यक्रमांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार,शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना शस्त्र,काठी, तलवार,बंदूक,लाठ्या किंवा शारीरिक इजा होऊ शकतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दगड, फेकावयाची साधने किंवा तत्सम वस्तू साठवणे,तयार करणे किंवा बाळगणे यास मनाई करण्यात आली आहे.
चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत कार्यरत असलेले वाहक आणि चालक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी करण्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी धाराशिव विभागात सुरू आहे. ते प्रत्येक आगारामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे सक्त आदेश विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून राज्यातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी लाखोंच्या संख्येने दररोज प्रवास करतात. सुरक्षित आणि सुखरुप प्रवास हे ब्रीद एस टी महामंडळाचे असून याप्रमाणेच प्रवाशांना सेवा दिली जाते. ही सेवा एस टी महामंडळ अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. मात्र, यातील काही चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जात असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व आगारांमध्ये चालक आणि वाहक यांची ड्युटीवर जाण्यापूर्वी म्हणजेच आगारात आल्याबरोबर अल्कोहोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एस टी महामंडळ धाराशिव विभाग नियंत्रक अनिल पाटील यांनी सर्व आगार प्रमुखांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष यंत्रणा कार्यान्वित करून अल्कोहोल तपासणी करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पथकाची नेमणूक करून तपासणी सुरू केले आहे. यावेळी तपासणी करणारे वाहतूक निरीक्षक याहिया काझी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कोमटवार व इतर पर्यवक्षीय कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांका त्रिपाठी देणार गोड बातमी; सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंपचे फोटो
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या चाहत्यांना एक अत्यंत सुखद बातमी दिली आहे. लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनंतर दिव्यांका आई होणार असून, तिने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या बेबी बंपचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना बातमी दिली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया […]
गुजरातमध्ये आश्रमाच्या नावाखाली सुरु होता बनावट नोटांचा कारखाना, 2 कोटींहून अधिक रक्कम जप्त
गुजरातमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्रमाच्या नावाखाली खोट्या नोटा छापण्याचे एक रॅकेट निदर्शनास आले आहे. श्री सत्य योग फाउंडेशनच्या आश्रमात बनावट नोटा छापण्याचे एक रॅकेट सुरू होते. बाहेरून धर्म आणि योगाचे केंद्र वाटणारा हा आश्रम, प्रत्यक्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या एका नेटवर्कचे केंद्र होते. अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरतमधून चालणाऱ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश […]
युद्धाच्या छायेतही इराणचा FIFA वर्ल्ड कप खेळणार, ठेवली महत्त्वाची अट
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या फुटबॉल संघाने FIFA वर्ल्ड कप 2026 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेल्या इराणने आता अटींसह स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अमेरिकेत सामने खेळण्यास स्पष्ट नकार देत त्यांनी FIFAसमोर महत्त्वाची मागणी ठेवली आहे. आगामी FIFA वर्ल्ड कप 2026 चे सामने अमेरिका, कॅनडा […]
Photo –मराठीजनांच्या एकतेची गुढी! आदित्य ठाकरे गिरगावच्या भव्य शोभायात्रेत सहभागी
आज गुढीपाडव्यानिमित्त युवासेनाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गिरगावच्या भव्य शोभायात्रेत सहभागी होत मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव साजरा केला.
मसूरमध्ये गॅसचा ‘काळबाजार’ जोरात? मसूर -युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. त्याची झळ मसूर परिसरातील नागरिकांना बसू लागली आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना तासन् तास उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. विविध तांत्रिक अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील [...]
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास प्रारंभ
रामनवमी उत्सवात विविध कार्यक्रमाची मेजवानी आचरा प्रतिनिधी आचरा येथे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे मानकरी, देवसेवक, महालदार, निशाण ,बावट्या,ढोल-ताशा,मृदुंग आदी सरंजामासह रविवारी दुपारी कानविंदे यांच्या वाड्यातूनपट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मुर्ती मोठ्या उत्साहात इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात आणण्यात आली.’ जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी ललकारी आसमंतात दुमदुमली. संस्थानी थाटात साजरा होणाऱ्या रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला [...]
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजीचा तुटवडा नवी दिल्ली – युद्धाच्या इराण-इस्त्रायल-अमेरिका पार्श्वभूमीवर भारताला एलपीजी सिलिंडरच्या सततच्या तुटवड्याचा आहे. सामना करावा लागत याचदरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना १० टक्के वाढीव एलपीजी कोटा देण्याचे बुधवारी जाहीर केले. तसेच राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या असून पीएनजीवरून एलपीजीकडे टप्याटप्याने [...]
कर्मचाऱ्याला पदोन्नतीसंबंधी नोंदी कळवणे बंधनकारकच; मुंबई उच्च न्यायालयाचा सीआरपीएफला आदेश
कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. पदोन्नतीच्या कार्यवाहीमध्ये पारदर्शकता राखणे आवश्यकच असल्याचे नमूद करीत उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने केंद्रीय राखीव पोलीस बलाला (सीआरपीएफ) मोठा दणका दिला. वार्षिक गोपनीय अहवालातील प्रतिकूल नोंदी किंवा पदोन्नतीमध्ये अडथळा ठरणाऱ्या नोंदी कर्मचाऱ्याला कळवणे आवश्यकच आहे. अशा नोंदी कर्मचाऱ्याला न कळवणे हे नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन आहे, असा निर्वाळा […]
होर्मुझनंतर इराणने यान्बूला लक्ष्य होर्मुझनंतर इराणने यान्बूला लक्ष्य केले आहे. सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावरील यान्बू बंदरात असलेल्या सॅमरेफ रिफायनरीवर गुरुवारी हवाई हल्ला झाला. ही रिफायनरी सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांचा संयुक्त उपक्रम आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला किरकोळ स्वरूपाचा होता आणि सुदैवाने यामुळे रिफायनरीचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे जागतिक […]
भर कार्यक्रमात भाजपच्या नेत्याला महिलेकडून मारहाण, 4.5 लाखांची फसवणुकीचा आरोप
भाजपच्या कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना बुधवारी घडली. एका महिलेने कार्यक्रमस्थळी घुसून पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप करत त्याच्यावर हल्ला केला. ही घटना महाराजगंज जिल्ह्यातील भाजप कार्यालयात घडली. नामनिर्देशित नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू होताच संबंधित महिला तेथे पोहोचली आणि तिने थेट एका […]
Dhurandhar 2 –तुमच्या वडिलांचे निधन झालंय असं रडा! रहमान डकैतच्या अंत्ययात्रेचा सीन असा शूट झाला
धुरंधर 2 ची गेले कित्येक दिवस प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. आज हा चित्रपट सिनेमागृहात रीलीज झाल्यानंतर, प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. धुरंधर 2 चित्रपटातील प्रत्येक सीन हा इतक्या सक्षमतेने शूट केलेला दिसत आहे. धुरंधरमधील रहमान डकैतची अंत्ययात्रा हा सीन पाहताना प्रेक्षकांच्या अंगावरही काटा आला. धुरंधरला हिट बनवण्यात अक्षय खन्नाने महत्त्वाची भूमिका बजावली. […]
Maharashtra Weather |गुढीपाडव्यावर पावसाचे सावट! महाराष्ट्रातील ‘या’जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता पुणे -मराठी नवीन वर्ष मानले जाणाऱ्या गुढी पाडव्यावरही यंदा पावसाचे सावट असून, गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिटीसह मध्यम स्वरुपाच्या वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, आसाम व अरुणाचल [...]
पश्चिम रेल्वेला मुंबई हायकोर्टाचा दणका; अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 8 लाखांची भरपाई
रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना 8 लाखांची भरपाई मंजूर करीत मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठा दणका दिला. रेल्वे रुळ ओलांडताना झालेला मृत्यू हा ‘अप्रिय घटना’ नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. तो दावा उच्च न्यायालयाने फेटाळला आणि अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई मंजूर केली. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणारे व्हॅलेंटाईन […]
वरळी येथे बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत महत्त्वाचे विधान केले. बीडीडी हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी पुर्नविकासाला सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू […]
‘डोरेमोन’चे दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लहान मुलांचा आवडता कार्टून शो ‘डोरेमोन’चे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ जपानी चित्रपट निर्माते, अॅनिमेशन दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. शिबायमा फुफ्फुसाच्या कर्करोग झाला होता. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्या त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन स्टुडिओ ‘एशिया-डो’ने दुजोरा दिला आहे. शिबायमा यांनी या स्टुडिओमध्ये उच्चस्तरीय नेतृत्व पदे […]
इराणकडे अण्वस्त्र नव्हती, इस्रायलमुळे परिस्थिती बिघडली, अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट
अमेरिकेच्या नॅशनल काउंटरटेररिझम सेंटरचे माजी संचालक जो केंट यांनी राजीनामा दिल्यानंतर मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या संघर्षाला चिथावणी देण्यात इस्रायलची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला असून, इराण त्या वेळी अण्वस्त्र बनवण्याच्या जवळही नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीत बोलताना केंट म्हणाले की, इस्रायलने काही असे पाऊल उचलले ज्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली आणि […]
Photo –पंढरपुरात चैत्र गुढीपाडव्याचा उत्साह, विठुरायाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि गाभारा विविध रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने न्हाऊन निघाला आहे. या नयनरम्य पुष्पविलेपनामुळे देवाचे सावळे रूप अधिकच तेजस्वी आणि प्रसन्न दिसत असून संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
अफगाणिस्तानात तयार झाला कमी दाबाचा पट्टा, हिंदुस्थानात अवकाळी पावसाची शक्यता
उत्तर हिंदुस्थानात हवामानात अचानक बदल झाला असून ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे अनेक भागांत पाऊस, वादळी वारे आणि गारवा जाणवत आहे. सामान्यतः असे वातावरण हिवाळ्यात तयार होतं. पण यावेळी मार्चमध्येच असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जाणवणारी तीव्र उष्णता अचानक कमी झाली आहे. या हवामान प्रणालीची खास बाब म्हणजे तिची रचना. अफगाणिस्तानपासून पाकिस्तानमार्गे हिंदुस्थानापर्यंत सरळ रेषेत […]
‘सरके चुनर’गाण्यावरून मोठा वाद; संजय दत्त आणि नोरा फतेहीला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स
आगामी कन्नड सिनेमा ‘केडी: द डेव्हिल’ मधील ‘सरके चुनर’ या गाण्यामुळे सध्या मनोरंजन सृष्टीसह देशभरात मोठा वादंग निर्माण झाला आहे. या गाण्यातील कथित अश्लीलता, असभ्य शब्द आणि सादरीकरणावरून जनमानसात संतापाची लाट उसळली असून, आता या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने या गाण्यातील सादरीकरण आणि शब्दांना आक्षेपार्ह मानत याची दखल घेत राष्ट्रीय महिला […]
मध्य-पूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. युद्धजन्य परिस्थिती असतानाच वॉशिंग्टनमधील एका अमेरिकी लष्करी तळावरून एक संशयास्पद ड्रोन उडताना दिसले. यानंतर वॉशिंग्टन परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अमेरिकी प्रशासन या ड्रोनबद्दल तपास करत आहे. ड्रोन ज्या ठिकाणी दिसले तेथे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचे निवासस्थान आहे. ड्रोन दिसल्यानंतर […]
अशोक खरातच्या नाशिकमधील फार्महाऊसमध्ये सापडले पिस्तूल आणि जिवंत काडतूस, पोलिसांकडून तपास सुरू
तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेले कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या […]
India Iran aid |युद्धाच्या आगीत भारताचा माणुसकीचा ओलावा! इराणला पाठवली वैद्यकीय मदतीची पहिली खेप
भारताकडून इराणच्या ‘रेड क्रेसेंट’ला जीवरक्षक औषधांचा पुरवठा नवी दिल्ली – इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणला वैद्यकीय मदतीचा पहिला साठा पाठवला आहे. अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा समावेश असलेला हा साठा इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द केला.भारतातील इराणच्या दूतावासाने या मदतीबद्दल भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियातील [...]
इस्रायल इराण संघर्षाचा गुंतवणूकदारांना फटका, अवघ्या 5 मिनिटांत 8 लाख कोटींचे नुकसान
आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना प्रचंड फटका बसला. अवघ्या 5 मिनिटांत दलाल स्ट्रीटवर असा मोठा धक्का बसला की गुंतवणूकदारांच्या सुमारे 8 लाख कोटी रुपये बुडाले. या घसरणीमागे इराण आणि अमेरिकेमधील वाढलेला भू-राजकीय तणाव कारणीभूत ठरला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून ब्रेंट क्रूडने […]
मिरज शहरात रमजान ईदपूर्वी बाजारपेठ सजली; खरेदीला गर्दी मिरज -दोन दिवसांवर आलेल्या रमजान ईद सणानिमित्त शहरातील बाजार पेठ फुलली असून, खरेदीचा उत्साहात बाढला आहे. आखाती युध्दामुळे सोन्या-चांदीचा दर कमी झाल्याने तयार दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. रमजाननिमित्त इदगाह समितीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ईदनिमित्त प्रमुख बाजार [...]
सांगलीत बांगलादेशी चोरट्यांची अटक सांगली – बेकायदेशीररित्या भारतात राहून चोऱ्या करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून १२ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. हिमेल [...]
Hapus mango price |सांगलीत हापूसचा ‘भाव’वधारला! गुढीपाडव्याला आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर.
३ ते ४ हजार रुपये डझनने सांगलीत विकला जातोय हापूस सांगली – गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याला मोठी मागणी असताना यंदा मात्र बाजारात आवक कमी झाल्याने हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. सांगली फळ मार्केटमध्ये सध्या हापूस आंबा ३ ते ४ हजार रुपये डझन [...]
पंढरपुरात चैत्र गुढीपाडव्याचा उत्साह, विठुरायाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि गाभारा विविध रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने न्हाऊन निघाला आहे. या नयनरम्य पुष्पविलेपनामुळे देवाचे सावळे रूप अधिकच तेजस्वी आणि प्रसन्न दिसत असून संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या […]
एलपीजी संकटामुळे सुरतमध्ये स्थलांतरित कामगारांचे हाल, महागाईमुळे गावाकडे परतण्याची वेळ
एलपीजी संकटामुळे निर्माण झालेल्या महागाईचा मोठा फटका सुरतमधील कामगारांना बसत असून, अनेक स्थलांतरित कामगारांना कुटुंबासह गावाकडे परतण्याची वेळ आली आहे. रोजगार असूनही वाढलेल्या गॅस दरांमुळे दैनंदिन जगणे कठीण झाल्याचे चित्र दिसत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. सुरतच्या पांडेसरा भागात राहणारे सुभाष ठाकूर हे मिलमध्ये काम करतात. पत्नी आणि दोन मुलांसह ते भाड्याच्या घरात […]
Kolhapur News |काळाचा घाला! हलकर्णीत निराधार वृद्धाचा संसार आगीत जळून खाक
नौकुड गावात भीषण आग; गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक हलकर्णी -नौकुड गावातील लक्ष्मण विष्टू तराळ ऊर्फ कांबळे यांचे राहते घर मंगळवारी 7 संध्याकाळी ५ वाजता आगीत पूर्णतः तू जळून खाक झाले. या आगीत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गटविकास अधिकार [...]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा अपघात, मुंबई IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबतच नाही आहे. लोणावळ्याजवळ एका कारचा भीषण अपघात झाला. गुरुवारी सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी ही घटना घडली. या अपघातात मुंबई आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ओमकुमार बोरसे, श्रेयंश शर्मा आणि ले असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तिघेही विद्यार्थी आपल्या अन् मित्रांसोबत लोणावळ्याला सहलीला गेले होते. तेथून परतत […]
Unseasonal rain |शिये परिसरातील शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
शिये परिसरात गारपिटीचा तडाखा; पांढराशुभ्र गारांचा सडा शिये : बुधवारी सायंकाळी शिये (ता. करवीर) आणि परिसर गारपिटीसह झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढला. त्यामुळे सर्वत्र गारांचा सडा पडला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर चाललेल्या या पावसात पाच-दहा मिनिटांच्या अंतराने मोठ्या प्रमाणात गारा पडत [...]
हलकर्णी परिसरात गारपिटीचा तडाखा हलकर्णी : मंगळवारी रात्री नांगनूरसहपरिसरातील शेतपिकांचे गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा व ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी केली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या जोरदार वादळी, गारपिटीच्या पावसाने काढणीला आलेला [...]
Murgud ambulance issue |आमदार फंडातून वर्षभरापूर्वी मुरगूडला मिळालेली पण धुळ खात पडलेली अँम्ब्युलन्स
मुरगूडमध्ये ॲम्बुलन्स धुळखात; वर्षभरातही उपयोग कमी मुरगूड ( रविंद्र शिंदे )-वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आमदार फंडातून मुरगूड नगरपालिकेला अँम्ब्युलन्स मिळून पूरते वर्ष सरले. मात्र ही ॲम्बुलन्स प्रत्यक्ष वापर करण्यामध्ये अनेक अडचणी असल्यामुळे सध्या अत्यंत कमी मागणी व अधिक धुळखात [...]
अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा प्रकार अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री गृहमंत्री तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत, हे राज्याचं दुर्दैव असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नवीन वर्ष महाराष्ट्राचं, मराठी […]
‘एलसीबी’चा कर्मचारी गुजरच्या बडतर्फीनंतर आता प्रभारी ‘रडार’वर
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) कर्मचारी शामसुंदर गुजर याने जप्त केलेल्या ड्रग्जची विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात आले. मात्र, जप्त मुद्देमालावर देखरेख ठेवणाऱया एलसीबीच्या निरीक्षकांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील साखळी उघडकीस येण्याची गरज अधोरेखित केली. जर वरिष्ठ अधिकारी […]
साताऱ्यातील राजघराण्याचा अनोखा आदर्श: किचन वेस्टपासून बायोगॅस निर्मिती सातारा – गेल्या दोन आठवड्याहून सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण जगावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.युद्धाची झळ भारतात देखील बसली असून नागरिकांना सर्व प्रकारच्या इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने व्यवसायिक [...]
Photo – 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वाघोलीत दिमाखदार सुरुवात
कुस्तीप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात, त्या मानाच्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पुण्यातील वाघोली येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मल्ल आता ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे
पुण्याच्या तीन मित्रांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू, लडाखहून परतत असताना काळाचा घाला
लडाखला पर्यटनासाठी गेलेल्या पुण्याच्या तीन मित्रांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू झाला. कोटा येथील बालापुराजवळ दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर बुधवारी दुपारी ही घटना घडली. एक भीषण रस्ते अपघात घडला, ज्यामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आणि घटनास्थळी एकच गोंधळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुणाल […]
इराणचे ‘आर या पार’…मोठे वांदे होणार, आखातातील तेल-गॅस प्रकल्प उडवून देण्याची धमकी
सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, सुरक्षा प्रमुख लारीजानी यांच्यानंतर इस्रायली हल्ल्यात आता गुप्तचर मंत्री ठार झाल्याने इराण चवताळला आहे. ‘आरपार’ची भाषा करत इराणने आखातातील तेल व गॅस प्रकल्प उडवून देण्याची धमकी दिली आहे. हे प्रकल्प तत्काळ खाली करण्याचा इशाराही त्यांनी सौदी, कतार आणि यूएईला दिला आहे. त्यामुळे तेल आणि गॅसचा तुटवडा वाढण्याची शक्यता असून मोठे […]
शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉमन ऑफ घेण्यासाठी 8 विद्यार्थ्यांकडून 3 विद्यार्थ्यांचे रॅगिंग होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रॅगिंग करण्यात येत असलेले हे तीन विद्यार्थी या महाविद्यालयातील एफ.वाय. इलेक्ट्रिकल इंजिनिअर या विभागामध्ये शिक्षण घेत आहेत. याच विभागातील 8 विद्यार्थी एकजूट करुन कॉमन ऑफ घेण्यासाठी मनमानी करुन मानसिक त्रास देत असल्याची माहिती […]
रासायनिक सांडपाणी तसेच जनावरांच्या मांसाचे अवशेष विनाप्रक्रिया थेट पाण्यात मिसळत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणात वाढ होत आहे. नदीकाठच्या जमिनी, विहिरी बाधित होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. तरीसुद्धा प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, प्रजासत्ताक सामाजिक संस्था, कॉमन मॅन संघटना यांच्याकडून आज प्रदूषण नियंत्रण […]
अॅसिड हल्ल्यातील नराधम अद्यापही मोकाटच! वडगाव पान, संगमनेरात मूक मोर्चा
तेरा वर्षांच्या मुलीवर ऍसिड हल्ला करणारा नराधम 30 तासांनंतरही मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आरोपीच्या शोधासाठी दहा पथके कार्यरत असल्याचे पोलीस सांगत असले, तरी प्रत्यक्षात तपास ठप्पच असल्याचे चित्र स्पष्ट आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे. वडगाव पान आणि संगमनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आज संतप्त जनतेने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यास […]
पर्शियन आखातामध्ये सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराण देखील हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत शेजारील देशांवर हल्ले करत आहे. इराणने गुरुवारी सकाळी कतारमधील जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू (LNG) निर्यात प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात रास लाफान इंडस्ट्रियल सिटी संकुलाचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जगातील एकूण एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के […]
वादळ वारे, गारांचा वर्षाव; अवकाळी पावसाने कोल्हापूरला झोडपले
गेल्या काही दिवसांपासून शक्यता वर्तविली जात असलेल्या अवकाळी पावसाने आज कोल्हापूरला झोडपले. हवामान खात्याने आज सायंकाळी सातच्या सुमारास ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. पावणेसातच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि गारांच्या वर्षावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे सर्वच ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वत्र […]
बजेटवरून स्थायी समितीत खडाजंगी, चुकीची आकडेवारी आणि अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून सदस्य संतप्त
महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षातील बजेटवर चर्चा करण्यासाठी आयोजित स्थायी समितीच्या सभेत आज बजेटवरून जोरदार खडाजंगी झाली. सभेला अनेक विभागप्रमुख गैरहजर होते. त्यावरून सभेला अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे सभापतींसह सदस्य संतप्त झाले. नगररचना, आरोग्य, अतिक्रमण निर्मूलन विभागांसह अनेक प्रभाग अधिकाऱयांच्या अनुपस्थितीवरून सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर मंगळवारी (17 रोजी) स्थायी समितीला सादर केलेल्या बजेटवरील विविध […]
सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता; भाजपचा करेक्ट कार्यक्रम!
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आज महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला आणि दणदणीत विजय मिळवळा. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषीकेश महेंद्र लाड हे विजयी झाले. एकूण 61 सदस्यांपैकी दोघांनाही 34 मते मिळाली. महायुतीच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार हिंमत जाधव यांना अवघी […]
बोरघाटात कंटेनर कारवर कोसळला; तीन ठार, सहा वाहने चिरडली
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर आज भीषण अपघात झाला. बोर घाटात सकाळी 10 वाजता एका कंटेनरने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. यानंतर कंटेनर एका कारवर कोसळला. या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे बोरघाटातील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. चालक अवधेश यादव हा पंटेनर घेऊन पुण्याहून मुंबईकडे […]
गंगा नदीत इफ्तार पार्टी; 14 अटकेत
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीपात्रात होडीत बसून इफ्तार पार्टी केल्याप्रकरणी 14 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. इफ्तार पार्टी करणाऱया तरुणांनी नेमका कोणता कायदा मोडला, असा सवाल काँग्रेसने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी काही तरुणांनी गंगा घाटावर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी काही तरुण अस्सी घाटावर […]
कुख्यात गँगस्टर रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या ताब्यात, मोक्का प्रकरणात मोठी कारवाई
कुख्यात गुंड रवी पुजारी (57) याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. रवी पुजारीविरोधात 2017मध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याने बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याला बंगळुरू येथील कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कासारवडवली येथील प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुंबई, […]
राजकीय नेत्यांचा ज्योतिषी अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ!
मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी कॅप्टन उर्फ अशोककुमार खरात याला नाशिक पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने आज त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. सुमारे 58 आक्षेपार्ह व्हिडीओ हस्तगत करण्यात आले असून, सखोल चौकशी सुरू आहे. राजकीय क्षेत्रातील बडय़ा हस्तींचे या घटनेमुळे धाबे दणाणले […]
देशात 67 टक्के पदवीधर बेरोजगार; तिघांपैकी दोघांना काम मिळेना, ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया’चे वास्तव
हिंदुस्थानात उच्च शिक्षणाची उपलब्धता वाढली असली तरी पदवीधर तरुणांसाठी पुरेशा नोकऱ्या निर्माण न झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026’ या अहवालानुसार, 2023 मध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बेरोजगार होते. बेरोजगारांमध्ये 15 ते 25 वयोगटातील पदवीधरांची संख्या 40 टक्के असून 25 ते 29 वयोगटातील बेरोजगार पदवीधरांची संख्या 20 […]
आयटी शेअर्समधील तेजीने मार्केट सावरले
आयटी शेअर्समधील तेजीने बुधवारी शेअर बाजार सावरला. इन्फोसिसच्या नेतृत्वाखाली आयटी शेअर्स वधारले. त्याचबरोबर भारती एअरटेल, एल अॅण्ड टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीने बाजाराला अतिरिक्त आधार मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती घसरल्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला, मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण बाजारासाठी नकारात्मक घटक ठरली. बीएसई सेन्सेक्स बुधवारी 76,367 वर मजबुतीने उघडला. व्यवहाराच्या […]
‘राजकारणात फुलस्टॉप नसतो. राज्यसभेतून निवृत्त झालेले सदस्य यापुढेही आपल्या अनुभवाच्या आधारे सामाजिक जीवनात योगदान देतच राहतील. भविष्य त्यांची वाट पाहत आहे,’ अशी सदिच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या. सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या 59 सदस्यांना आज राज्यसभेतून निरोप देण्यात आला. त्यावेळी मोदी बोलत होते. ‘संसद हे एक मुक्त विद्यापीठ आहे. […]

27 C